“माझ्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे खोट्या! काजल अग्रवालची हास्यास्पद प्रतिक्रिया”

(फोटो: काजल अग्रवाल इंस्टाग्राम)
अलीकडेच दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवालच्या अपघाती मृत्यूबाबत अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या. काहींनी तर तिचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला. या खोट्या बातम्यांनी तिचे चाहते काळजीत पडले.
मात्र आता स्वतः काजलनेच या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.काय म्हणाली काजल?काजलने एक्स (पूर्वीचा ट्विटर) आणि इंस्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने स्पष्ट केले की, “माझ्या अपघाताबाबत काही निराधार आणि हास्यास्पद बातम्या पसरवल्या जात आहेत. मी ठणठणीत आहे, सुरक्षित आहे आणि खूप चांगली आहे. कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.” तिने पुढे सांगितले की, “आपली ऊर्जा सकारात्मकतेवर आणि सत्यावर केंद्रित करूया!”

(फोटो: काजल अग्रवाल इंस्टाग्राम)
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘कन्नप्पा’ या चित्रपटात दिसली होती. शिवाय ती सलमान खानच्या ‘सिकंदर’मध्येही झळकली होती.सध्या ती कमल हासनच्या ‘इंडियन ३’ चित्रपटावर काम करत आहे. शिवाय काजल नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये मंदोदरीची भूमिका साकारणार आहे.
