क्राईम

वसई: अमली पदार्थ तस्करीवर धडक कारवाई! ८ महिन्यांत ५६ कोटींच्या अमली पदार्थांचा जाळा उध्वस्त, २८७ आरोपींना अटक!

मीरा भाईंदर, वसई, विरार शहरात अमली पदार्थांच्या तस्करीने जोर धरला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने मोठी मोहीम राबवली असून, गेल्या ८ महिन्यांत ५६ कोटी ६८ लाख रुपयांच्या अमली पदार्थ जप्त कले. यामध्ये ९३५ गुन्हे नोंदवले असून २८७ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्य तस्करीचे हॉटस्पॉट

शहरातील तुळींज, संतोष भवन, प्रगतीनगर, अलकापुरी, आचोळे, डोंगरी, भीम डोंगरी, शिर्डीनगर, बिलालपाडा, मोरे गाव तलाव परिसर, अगरवाल नगर यांसारखे भाग अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनले आहेत. मीरा भाईंदरच्या मिरारोड, हटकेश परिसरातही तस्करीचे प्रकरणे वाढली आहेत.

तेलंगणातून येणारी मोठी खेप पकडली

पोलीस तपासात उघडकीस आले की, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणात गुन्हे शाखेने मोठी छापेमारी केली, जिथून तब्बल ६ हजार किलो मॅफेड्रोन जप्त झाला, ज्याची बाजारभावी किंमत १२ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

नायजेरियन नागरिकांचा वाढता सहभाग

वसई, विरारमध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक राहत असून, त्यांचाही तस्करीत सक्रिय सहभाग असल्याचा समोर आले आहे. विशेषतः नालासोपारा भागात नायजेरियन नागरिकांचा प्रभाव वाढतो आहे.

पोलीस आयुक्तांचे शब्द

“अमली पदार्थ फक्त व्यक्तीचे नुकसान करत नाही, तर संपूर्ण समाजात धोका निर्माण करतो. त्यामुळे आम्ही या तस्करीविरुद्ध लढा अधिक तीव्र करणार आहोत,” असे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *