बॉलीवूडमनोरंजन

To Much With Kajol and Twinkle: काजोल आणि ट्विंकल खन्नाचा नवा धमाकेदार टॉक शो

बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना आता प्रेक्षकांसाठी एक भन्नाट टॉक शो घेऊन येत आहेत. ‘टू मच विथ काजोल अॅण्ड ट्विंकल’ असे या शोचे नाव असणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकतेच इंस्टाग्रामवर या शोचे नवीन पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “गोष्टी अजून थोड्या जास्त होणार आहेत!” आणि या दोघी अभिनेत्री एकत्र आल्या म्हणजे धमाल होणारच!

कोण असतील खास पाहुणे?

या टॉक शोमध्ये अनेक मोठे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. सलमान खान, आमिर खान, करण जोहर, जान्हवी कपूर, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्या उपस्थितीची शक्यता आहे. पाहुण्यांच्या गप्पा, मजा, किस्से आणि अप्रतिम केमिस्ट्री यामुळे हा शो खास ठरणार आहे.

एक हटके जोडी

काजोलने अलीकडेच ‘सरजमीन’ आणि हॉरर चित्रपट ‘मा’ मधून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. तर ट्विंकल खन्ना सध्या लेखिका म्हणून सक्रिय असून, तिच्या विनोदी शैलीमुळे ती नेहमी चर्चेत असते. ‘टू मच विथ काजोल अॅण्ड ट्विंकल’ हा शो २५ सप्टेंबरपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *