‘जटाधारा’ ७ नोव्हेंबर २०२५ ला होणार प्रदर्शित; सोनाक्षी-सुधीर बाबूचा भव्य पौराणिक सिनेमा!
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि दाक्षिणात्य सुपरस्टार सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित पौराणिक ‘जटाधारा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा भव्य चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, तो हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
निर्मात्यांनी नुकतेच ‘जटाधारा’चे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यात दैवी मंत्र, भव्य दृश्ये आणि ऊर्जेने भरलेले पात्र दिसून येतात. ट्रेलरमध्ये प्रकाश व अंधार, चांगले व वाईट, मानवी इच्छा आणि वैश्विक नशिबाचा संघर्ष उलगडताना दिसतो. या चित्रपटात सोनाक्षी आणि सुधीर बाबू यांच्यासोबत दिव्या खोसला आणि शिल्पा शिरोडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की, ‘जटाधारा’ हा केवळ चित्रपट नाही, तर एक भव्य अनुभव आहे.स्केल, स्टोरीटेलिंग आणि दृष्टीकोन यांचे मिश्रण आहे. निर्मात्या प्रेरणा अरोरा म्हणाल्या, “ही कथा भारतीय संस्कृतीची खोल मुळे जागतिक पातळीवर घेऊन जाते. प्रेक्षकांना एक भावनिक आणि सिनेमॅटीक अनुभव मिळणार आहेत.
“दिग्दर्शक अभिषेक जयस्वाल आणि वेंकट कल्याण यांनी सांगितले की, ‘जटाधारा’ ही श्रद्धा, भय आणि नियतीवर आधारित एक गूढ कथा आहे. अंधाराचा सामना करणाऱ्या दैवी शक्तींची ही अद्भुत गाथा प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजेल.
