इमरान हाश्मी, यामी गौतम यांच्या आगामी कोर्टरुम ड्रामाचा मुहूर्त ठरला
बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि यामी गौतम पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. हक हा त्यांचा आगामी चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सुपरन वर्मा दिग्दर्शित हा कोर्टरूम ड्रामा भारतातील सर्वात चर्चास्पद आणि ऐतिहासिक खटला ‘शाह बानो विरुद्ध अहमद खान’ प्रकरणावर आधारित आहे. या प्रकरणाने देशभरात वैयक्तिक कायदे, महिलांचे हक्क आणि धर्मनिरपेक्षतेवर मोठी चर्चा निर्माण केली होती.
चित्रपटाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्स, इन्सोम्निया फिल्म्स आणि बावेजा स्टुडिओज संयुक्तपमे करत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, वादग्रस्त विषय आणि भावनिक संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
