आर्यन खानचे दिग्दर्शनासोबतच गायनातही पदार्पण! दिलजीतसोबत ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये गातोय
बॉलीवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेबसिरीजद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. विशेषत: या वेबसिरीजमधील गाण्याच्या माध्यमातून त्याने गायन कारकिर्दीचीही सुरुवात केली आहे. त्याच्यासोबत लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ गाणार आहे.
‘तेनू की पता’ गाण्यामुळे चर्चेत
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील ‘तेनू की पता’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, यामध्ये आर्यन, दिलजीत आणि संगीतकार उज्ज्वल गुप्ता यांचे आवाज एकत्र ऐकायला मिळतात. गीतकार कुमार यांनी लिहिलेले हे गाणे, वेबसिरीजमधील ‘तू पहली तू आखरी’ आणि ‘बदली सी हवा’ या गाण्यांनंतरचे तिसरे गाणे आहे.

(फोटो तेनु की पता पोस्टर सौजन्य: इंस्टाग्राम)
दिग्गज कलाकार एकत्र
या वेबसिरिजमध्ये प्रमुख भूमिका लक्ष्य, राघव जुयाल, साहेर बंबा आणि आन्या सिंग साकारत असले तरी, कॅमिओमध्ये शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, राजामौली आणि दिशा पटानी यांसारखे दिग्गज झळकणार आहेत.
१८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेबसिरीज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, ती बॉलीवूडच्या ग्लॅमरच्या पलीकडचे वास्तव दाखवणार असल्याचे बोलले जात आहे.
