सोनम कपूर बॉलिवूड पुनरागमनासाठी सज्ज
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आता रुपेरी पडद्यावर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. आई होण्याचा सुखद अनुभव घेतल्यानंतर, सोनमने नुकतेच जाहीर केले की २०२५च्या अखेरीस ती तिचा पहिला प्रोजेक्ट सुरू करणार आहे. “नीरजा”, “राँझणा” आणि “दिल्ली-६”सारख्या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी सोनम आता पुन्हा एकदा लक्षवेधी भूमिकांसाठी सज्ज होत आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत सोनमने तिच्या आई होण्याच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली, “मी माझ्या मुलासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. आई होणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव होता”. पुढे ती म्हणाली, “मला आता अशा कथा करायच्या आहेत जिथे केवळ महिला सुंदर नसून, सशक्त आणि अर्थपूर्ण असतील. मी पुन्हा एकदा अशाच प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे.” सोनमच्या या चित्रपटाचे नाव अजुन गुलदस्त्यात असले तरी सोनमच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

अभिनयापासून जरी सोनम दूर असली तरी फॅशन क्षेत्रात तिची छाप कायम असून अलीकडेच “व्हिस्पर्स फ्रॉम द व्हॅली” या कलेक्शनमधील गाऊनमध्ये ती झळकली होती.
