Uncategorizedबॉलीवूडमनोरंजन

Nawazuddin Siddiqui Begins Shooting Blind Babu: ‘ब्लाइंड बाबू’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा डार्क-कॉमेडी अंदाज; चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

बॉलीवूडचा प्रतिभावान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रवी वर्मा दिग्दर्शित ‘ब्लाइंड बाबू’ या डार्क-कॉमेडी थ्रिलर चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले असून, नवाजुद्दीनने या प्रकल्पासाठी अधिकृतपणे होकार दिला आहे.

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

‘अब बम फटेगा या कुछ और?’

दिग्दर्शक रवी वर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाची घोषणा करत, नवाजुद्दीनसह टीमचे फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये नवाज आणि रवी ‘ब्लाइंड बाबू’चा क्लॅपबोर्ड हातात घेऊन उत्साहाने पोज देताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण टीम एकत्र आहे. वर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता बॉम् फुटेल की अजून काही? सज्ज व्हा एका गडद पण हास्यरसाने भरलेल्या प्रवासासाठी… #ब्लाइंडबाबूचा प्रवास आता सुरू होत आहे!”

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

‘ब्लाइंड बाबू’मध्ये नवाजुद्दीनसह झाकीर हुसेन, पवन मल्होत्रा आणि मुकेश तिवारी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहे. नुकताच नवाजचा ‘आय एम नॉट एन अ‍ॅक्टर’ अमेरिकेतील डीसी साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला.

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘रात अकेली है २’मध्येही दिसणार आहे. शिवाय आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि दिनेश विजान व अमर कौशिक निर्मित ‘थामा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात तो आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *