काजोलने पुन्हा मोडली ‘नो-किसिंग पॉलिसी’
बॉलीवूड अभिनेत्री काजोलचा ‘द ट्रायल २’ या वेब सीरिजमधील लिपलॉक सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काजोलची ‘द ट्रायल २’ ही वेबसीरिज १९ सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा नोयोनिका सेनगुप्ता या वकिलाच्या भूमिकेत झळकते. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्येही तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
काजोलने तिच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत कधीच किसिंग सीन केले नव्हते. तिची स्पष्ट भूमिका होती “नो किसिंग ऑन स्क्रीन”. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पणानंतर तिची भूमिका बदलली आहे. पहिल्या सीझनमध्ये तिने पहिल्यांदा ऑनस्क्रीन पतीला किस केले होते. आता, ‘द ट्रायल २’मध्ये पुन्हा एकदा तसाच लिपलॉक सीन पाहायला मिळतो.

काजोलने पूर्वी सांगितले होते की, “मला अशा सीनमध्ये कम्फर्टेबल वाटत नव्हते, पण आता काळ बदलला आहे. पात्राच्या गरजेनुसार काही निर्णय घ्यावे लागतात.” काजोलने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘फना’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांना वेड लावले आहे. शाहरुख खानसोबतची तिची जोडी अजूनही चाहत्यांच्या मनात आहे.
