ऐश्वर्या राय अजूनही बच्चन कुटुंबाची सून
बॉलिवूडचे नेहमीच चर्चेत असणारे जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून अनेक अफवा पसरत होत्या. काहींनी तर या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण दिले. परंतु, आता या चर्चांवर प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ऐश्वर्याचे शेजारी प्रल्हाद कक्कर यांनी मौन सोडत सत्य मांडले आहे.
प्रल्हाद कक्कर यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, “घटस्फोटाच्या चर्चा फक्त अफवा होत्या. ऐश्वर्या आणि अभिषेक अजूनही एकत्रच राहतात.” ते पुढे म्हणाले की, ऐश्वर्या राय तिच्या आईच्या तब्येतीची काळजी घेत असल्यामुळे तिच्याकडे जास्त वेळ घालवते.”ती रोज सकाळी आराध्याला शाळेत सोडते आणि शाळा सुटेपर्यंत आईकडे थांबते. यात वेगळे राहण्याचा काही संबंध नाही.”
कक्कर पुढे म्हणाले की, ऐश्वर्याला तिच्या आईची खूप काळजी आहे. “लोक म्हणतात ती वेगळी राहते, पण ती फक्त वेळ देण्यासाठी जाते. कधी कधी अभिषेकही तिच्यासोबत जातो.” जर त्यांचे नाते तुटले असते, तर अभिषेक तिच्यासोबत आला असता का? असा सवालही त्यांनी केला. जया बच्चन आणि श्वेता बच्चनसोबत पटत नाही? या प्रश्नावर प्रल्हाद कक्कर उत्तर देत म्हटले की, “यात काहीच तथ्य नाही. ऐश्वर्या अजूनही त्या घराची सून आहे आणि घर सांभाळते.”
