पवन कल्याणच्या ‘दे कॉल हिम ओजी’चा ट्रेलर प्रदर्शित
दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. त्याचा बहुप्रतिक्षित गँगस्टर ड्रामा ‘दे कॉल हिम ओजी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला खतपाणी मिळाले आहे. ट्रेलरमध्ये पवन कल्याणची दमदार एंट्री, अॅक्शन आणि संवादांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहे. “ओजस गंभीरा” या पात्रात तो गुन्हेगारी जगताविरुद्ध झुंजताना दिसतो. तलवार, बंदूक आणि त्याच्या नजरेतील अंगार यामुळे पवनच्या अॅक्शन अवताराची झलक स्पष्ट दिसते.

ट्रेलरमध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत झळकतो आणि त्याची एन्ट्री अवघ्या काही सेकंदात लक्ष वेधून घेते. पवन कल्याण विरुद्ध इमरान हाश्मी, दोघांना आमनेसामने बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. ही कथा एका गँगस्टरच्या साम्राज्याची, त्याच्या कुटुंबासाठी आणि लोकांसाठी लढणाऱ्या वीराची आहे.
चित्रपटात पवन कल्याण आणि इमरान यांच्याशिवाय प्रियांका अरुल मोहन, श्रीया रेड्डी, प्रकाश राज, अर्जुन दास आणि शाम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. डीव्हीव्ही एंटरटेनमेंट निर्मित …ओजी 25 सप्टेंबर म्हणजेच आज चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
