बॉलीवूडमनोरंजन

शाहिदने सुरु केले ‘कॉकटेल 2’चे चित्रीकरण; क्रिती-रश्मिकाही झळकणार

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या प्रमुख भूमिका असलेला कॉकटेल २०१२ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या दमदार कथेने, संगीताने आणि हटके पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवली. आता दिग्दर्शक होमी अदजानिया पुन्हा एकदा तिच जादू घेऊन परतत आहेत. पण यावेळी चित्रपटाची स्टारकास्ट वेगळी असणार आहे.

स्टारकास्टमध्ये नवा ट्विस्ट

शाहिद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदान्ना या तिघांची भन्नाट जोडी या वेळी ‘कॉकटेल २’मध्ये झळकणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. शाहिद कपूरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, “नवीन सुरुवात! कॉकटेल २” शाहिद कपूरने ‘कॉकटेल २’चे चित्रीकरण सुरु केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील वेगवेगळ्या लोकेशन्ससोबत युरोपच्या सुंदर ठिकाणी होणार आहे. दृष्यांची भव्यता आणि पार्श्वभूमी यामुळे ‘कॉकटेल २’ हा एक व्हिज्युअल ट्रीट ठरणार, असे मानले जात आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल.

सगळ्यांचे वर्क फ्रंट कसे आहेत?

शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘देवा’मध्ये झळकला होता. लवकरच तो विशाल भारद्वाज यांच्या ‘रोमियो’मध्ये तृप्ती डिमरी, दिशा पटानी आणि अविनाश तिवारी यांच्यासोबत दिसणार आहे. क्रिती सेनॉनने नुकतेच आनंद एल राय यांच्या ‘तेरे इश्क में’चे चित्रीकरण पुर्ण केले आहे. तर रश्मिका मंदान्ना लवकरच ‘थामा’मध्ये आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *