बॉलीवूडमनोरंजन

‘शक्ती शालिनी’त अनित पड्डा नाही!

मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वातील चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्त्री, भेडीया, मुंज्या आणि ‘स्त्री २’ मॅडॉकचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. आता या विश्वातील पुढचा धमाकेदार भाग ‘थामा’ या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत झळकतील. विशेष म्हणजे या चित्रपटात वरुण धवनचाही एका खास कॅमिओ बघायला मिळेल.

दरम्यान, मॅडॉकच्या आगामी ‘शक्ती शालिनी’ या चित्रपटात सैयारा फेम अनित पड्डा मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या अफवा गेले काही दिवसांपासून जोर धरत होत्या. यावर आता खुद्द मॅडॉक फिल्म्सनेच मौन सोडले आहे. त्‍यांच्‍या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “आमच्या हॉरर-कॉमेडी विश्वाभोवती असलेल्या उत्साहाची आम्ही खूपच कदर करतो, पण ‘शक्ती शालिनी’ आणि ‘महा मुंज्या’ यासारख्या चित्रपटांच्या कलाकारांबाबत सध्या फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे अनुमानावर आधारित आहेत. कृपया आमच्या अधिकृत घोषणांची वाट पहा.” यातून स्पष्ट झाले आहे की, या अफवांमध्ये तथ्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *