मनोरंजनसाउथ सिनेमा

“कांतारा…”चा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमधील ऋषभ शेट्टीचा रुद्रावतार पाहून प्रेक्षक भारावले

या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ऋषभ शेट्टीच्या “कांतारा: चॅप्टर १”चा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो ट्रेंडींगला आला आहे. ट्रेलरमध्ये ऋषभ शेट्टी आणि गुलशन देवैया यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो. गुलशन एक अत्याचारी राजा म्हणून खलनायकी रंगवताना दिसतो, तर ऋषभ शेट्टी या अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर योद्धा म्हणून झळकतो.

चित्रपटाच्या कथेमध्ये भारतीय संस्कृती, दंतकथा आणि लोककथांचे प्रभावी मिश्रण आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्ये प्रेक्षकांना थक्क करणारी आहेत. दमदार व्हिएफएक्स आणि भरजरी साजसज्जेमुळे प्रेक्षकांना सिनेमॅटीक अनुभव मिळणार आहे. “कांतारा”च्या प्रीक्वेलमध्ये ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि अभिनेता दोन्ही भूमिकेत झळकणार आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री ऋक्मिणी वसंत नायिकेच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. होम्बाले फिल्म्सच्या या भव्य चित्रपटाचा हिंदी ट्रेलर हृतिक रोशनने, तेलुगू ट्रेलर प्रभासने, तमिळ ट्रेलर शिवकार्तिकेयनने, तर मल्याळम ट्रेलर पृथ्वीराज सुकुमारनने लाँच केला. लोककथा आणि आधुनिक सिनेमा यांचे अनोखे मिश्रण असलेला ‘कांतारा…’ पुन्हा एकदा इतिहास रचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “कांतारा: चॅप्टर १” 2 ऑक्टोबर 2025 रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *