मनोरंजनसाउथ सिनेमा

नागार्जुनचा कल्ट क्लासिक चित्रपट ३६ वर्षांनंतर पुन्हा चित्रपटगृहात होणार प्रदर्शित; भारतीय सिनेमाला हादरवणारा चित्रपट

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शिवा’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार आहे. नागार्जुनने त्याच्या एक्स अकाउंटवर ही घोषणा करताना लिहिले की,”माझे वडील ए. एन. आर यांच्या जयंतीनिमित्त, मला आनंद होत आहे की भारतीय सिनेमाला हादरवणारा ‘शिवा’ लवकरच चित्रपटगृहात परत येतोय!”

१४ नोव्हेंबर २०२५ रोजी ४K डॉल्बी अ‍ॅटमॉस स्वरूपात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे. ही त्याच्या वडिलांच्या स्वप्नाला अर्पण केलेली भावांजली असल्याचे त्याने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाची पोस्ट शेअर केली आहे.

१९८९ मध्ये आलेल्या या चित्रपटात नागार्जुनने शिवा नावाच्या एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती, जो कॉलेजमधील गुंडगिरीविरोधात उभा राहतो. कॉलेजमधील राजकारणही या चित्रपटात पाहायला मिळते. १९९० मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील करण्यात आला, जो तितकीच गाजला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *