बॉलीवूडमनोरंजन

हॉलिवूड स्टार सिडनीला बॉलावूड डेब्यूसाठी 530 कोटींची ऑफर

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिडनी स्वीनी हिच्या बॉलिवूड डेब्यूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तिला ५३० कोटी रुपयांची आश्चर्यकारक ऑफर देण्यात आली असून, हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सिडनी स्वीनी ही एक प्रसिद्ध अमेरिकन स्टार आहे. तिने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘द सन’मधील वृत्तानुसार, एक भारतीय निर्मिती कंपनी सिडनी स्वीनीचे आंतरराष्ट्रीय स्टारडम वापरु इच्छिते. म्हणून, तिला या चित्रपटासाठी ५३० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये ४१५ कोटी रुपयांची फी आणि ११५ कोटी रुपयांचा प्रायोजकत्व करार समाविष्ट आहे. इतक्या मोठ्या ऑफर रकमेमुळे ती स्वतः आश्चर्यचकित झाली आहे. या चित्रपटात सिडनी एका अमेरिकन स्टारची भूमिका साकारणार आहे जी एका भारतीय सेलिब्रिटीच्या प्रेमात पडते. या चित्रपटाचे चित्रीकरण २०२६ मध्ये सुरू होणार असून, लंडन, दुबई, न्यू यॉर्क आणि पॅरिसमध्ये केले जाईल. अद्याप या चित्रपटाचे शिर्षक, दिग्दर्शक, निर्माते आणि सिडनी व्यतिरीक्त कोणकोणते कलाकार चित्रपटात झळकतील, ही सर्व माहिती गुलदस्त्यात आहे.

२८ वर्षीय सिडनीला युफोरिया या मालिकेतून ओळख मिळाली. पुढे ती “वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड”, “एनीवन बट यू”, “मॅडम वेब” यांसारख्या अनेक यशस्वी प्रकल्पांत दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *