रितेश, विवेक, आफताब पुन्हा करणार मस्ती; मस्ती 4चा धमाल टीझर प्रदर्शित
बॉलीवूडची सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझी “मस्ती” आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. “मस्ती ४”चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांचे धमाल पुनरागमन पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये भरपूर हास्य, मस्ती आणि वेडेपणा यांची झलक पाहायला मिळते.

मस्ती 4मध्ये रितेश, विवेक आणि आफताब यांच्याशिवाय अरशद वारसी, श्रेया शर्मा, रुही सिंग, नर्गिस फाकरी आणि एलनाज नौरोझी यांच्याही प्रमख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण यूके आणि मुंबईत झाले आहे. दिग्दर्शक मिलाप झवेरी या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले की, “पहिल्या दोन मस्ती चित्रपटांचे लेखन केल्यानंतर आता ‘मस्ती ४’ दिग्दर्शित करणे हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. या भागात आम्ही वेडेपणा आणि विनोद नव्या उंचीवर नेले आहे. टीझर फक्त सुरुवात आहे!”
झी स्टुडिओज आणि वेव्हबँड प्रॉडक्शन निर्मित मस्ती 4 २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
बॉलीवूड
