मनोरंजनसाउथ सिनेमा

‘ड्रॅगन’साठी एनटीआरचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या आगामी बिग बजेट ‘ड्रॅगन’ या अॅक्शनपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा जिममधील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यात त्याचे आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळते.

प्रशांत नील दिग्दर्शित ‘ड्रॅगन’साठी एनटीआरने आपला लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याने वजन घटवले असून आता तो अधिक सडपातळ, फिट आणि स्टायलिश दिसतो आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांचा हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात बजेटची कुठलीही मर्यादा नाही असे बोलले जात आहे. ‘ड्रॅगन’ हा एक व्हिज्युअल ब्लॉकबस्टर ठरणार अशी चर्चा असून, अ‍ॅक्शन आणि स्टोरीटेलिंगचा अस्सल तडका या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात रुक्मिणी वसंत नायिकेच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीचाही एक खास कॅमिओ असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च २०२५ मध्ये सुरू झाले असून, हा चित्रपट २५ जून २०२६ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *