क्रीडा

BCCI अध्यक्ष होणार सचिन तेंडुलकर? मास्टर ब्लास्टरने दिले स्पष्ट उत्तर!

भारतीय क्रिकेटमधील देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा (BCCI) पुढील अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात जोरात आहे. मात्र, खुद्द सचिननेच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केले की, “बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा विचार केला जात असल्याच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सर्वांनी अशा अफवांपासून दूर राहावे.”

रॉजर बिन्नींच्या निवृत्तीमुळे चर्चेला उधाण

२०२२ मध्ये बीसीसीआय अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची निवड झाली होती. मात्र, बीसीसीआयच्या नियमानुसार ७० वर्षांनंतर पदावर राहता येत नाही. बिन्नी लवकरच वयाची मर्यादा पार करत असल्यामुळे नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत नवे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे.

(फोटो रॉजर बिन्नी सौजन्य: विकिपीडिया)

सचिन तेंडुलकर या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता BCCI अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *