क्रीडा

ENG vs SA: मँचेस्टरमध्ये इतिहास घडला! इंग्लंडने मोडला टी-२०तील सर्वात मोठा विक्रम

मँचेस्टर: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने सर्वात मोठा विक्रम मोडून दाखवला आहे. मँचेस्टरच्या मैदानावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावांचा डोंगर उभारला, जो आयसीसी फुल मेंबर राष्ट्राविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा स्कोअर ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. फिल सॉल्टने अवघ्या ४१ चेंडूत वेगवान शतक ठोकत इंग्लंडसाठी टी-२०तील सर्वात जलद शतक झळकावले. जोस बटलरनेही केवळ ३० चेंडूत ८३ धावांची वादळी खेळी केली. दोघांच्या जोरावर इंग्लंडने २० षटकांत २ गडी गमावून ३०४ धावा केल्या.

फिल सॉल्टने ६० चेंडूत १४१ धावा करत १५ चौकार आणि ८ षटकार लगावले, तर बटलरने ८ चौकार व ७ षटकार खेचले. शेवटी जेकब बेथलने 14 चेंडूत 26 धावा चोपल्या. तर हॅरी ब्रुकने 21 चेंडूत 41 धावांची जलद खेळी खेळली.

टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या ३४४ धावांच्या नाण्याखाली आहे. परंतु फुल मेंबर राष्ट्राविरुद्ध हा विक्रम भारताकडे २९७ धावांनी होता. आता इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावा करुन हा सर्वात मोठा विक्रम मोडून काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *