क्रीडा

ASIA CUP 2025: ‘गुगली… फ्लिपर… मलाही त्याचा चेंडू वाचता येत नाही’, पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाकडून कुलदीप यादवचे कौतुक

भारत आणि युएई यांच्यातील आशिया कप २०२५ चा पहिला सामना काल झाला. आता सर्वांच्या नजरा रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर आहेत. ही लढत देखील खास आहे कारण पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. राजकीय आणि लष्करी तणावादरम्यान, हा सामना क्रिकेटच्या पलीकडे भावनांना स्पर्श करणारा आहे. बुधवारी, आशिया कप २०२५च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा नऊ विकेट्सने पराभव केला. कुलदीप यादव या सामन्याचा हिरो ठरलवा. आता पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने कुलदीपचे कौतुक केले आहे. पाहुया तो काय म्हणाला…

पाकिस्तानविरुद्धच्या हाय होल्टेज सामन्यापूर्वी, वसीम अक्रमने भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे कौतुक केले. कुलदीपने बुधवारी युएईविरुद्ध चार विकेट्स घेतल्या आणि विरोधी फलंदाजांना पूर्णपणे चकित केले. यामध्ये एका षटकात तीन विकेट्सचा समावेश आहे. अक्रमने सोनी स्पोर्ट्सवर सांगितले की, ‘लेग-स्पिनर, गुगली, फ्लिपर… मी इथे बसूनही ते वाचू शकत नाही. रिप्लेमध्येही पाहणे ते कठीण आहे. मला आठवते जेव्हा कुलदीप लहान होता आणि कोलकाता नाईट रायडर्सशी संबंधित होता. तो आणि मोहम्मद शमी नेहमीच माझ्यासोबत असायचे. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, सामन्यादरम्यान, नेहमीच माझ्यासोबत. जरी ते खेळत नसले तरी ते माझ्या जवळ बसायचे. त्यांना खेळायची भूक लागली होती.

शमीसोबतच्या आठवणी

(मोहम्मद फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

कुलदीपची युएईविरुद्धची घातक गोलंदाजी

कुलदीपच्या जादूमुळे युएई संघ अडचणीत आला होता. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने २.१ षटकांत फक्त सात धावा देऊन चार विकेट घेतल्या. याशिवाय शिवम दुबेने तीन विकेट घेतल्या. यामुळे युएई संघ १३.१ षटकांत ५७ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात भारताने ४.३ षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. कुलदीपला सामनावीर ठरला.

(कुलदीप यादव, सुर्यकुमार यादव फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

फिटनेस आणि तयारीचा परिणाम

इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांदरम्यान बेंचवर बसल्यानंतर, कुलदीपला अखेर आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने स्वतःला आणखी तंदुरुस्त म्हणुन सिद्ध केले. तो म्हणाला की, ‘ट्रेनर एड्रियन (ले रॉक्स) यांचे आभार. मी माझ्या गोलंदाजी आणि तंदुरुस्तीवर काम करत होतो. सर्व काही उत्तम प्रकारे चालू आहे. पुढच्या चेंडूवर फलंदाज काय करेल याचा मी विचार केला आणि त्यानुसार गोलंदाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *