CONFERMED! ‘मिर्झापूर: द फिल्म’मध्ये अभिषेक बॅनर्जी उर्फ कम्पाउंडरचे दमदार पुनरागमन
‘मिर्झापूर: द फिल्म’मध्ये अभिषेक बॅनर्जीचे धमाकेदार पुनरागमन झाले आहे. चित्रपटाच्या टिमने याची अधिकृत पुष्टी केली आहे. मिर्झापुर या वेब सिरीजमध्ये मुन्ना भैयासोबत कम्पाउंडरची केमिस्ट्री, त्याचा बेधडक स्वभाव, सडेतोड अंदाज, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि खतरनाक स्वॅग अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. आता ही जोडी पुन्हा एकत्र येणार, पण यावेळी मोठ्या पडद्यावर, मोठ्या स्केलवर आणि मोठ्या सस्पेन्ससह!

(फोटो सौजन्य आयएमडीबी)
क्राईम, कटकारस्थानं आणि कम्पाउंडरचा खतरनाक गेम
‘मिर्झापूर: द फिल्म’ या बहुप्रतिक्षित सिनेमामध्ये कम्पाउंडरच्या पुनरागमनाने कथा कुठे वळण घेईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तो त्याचा मागील बदला घेण्यासाठी आला आहे का? की नवा राज निर्माण करणार? हे आता चित्रपटातच उलगडणार.
