बॉलीवूडमनोरंजन

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; वरुण-जान्हवीची भन्नाट केमिस्ट्री आणि धमाल कथा

ट्रेलरमध्ये काय खास?

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या नावाइतकाच भन्नाट आणि गोंधळाने भरलेला हा ट्रेलर आहे!

2 मिनिटं 54 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना एक मजेदार आणि गुंतागुंतीची प्रेमकथा पाहायला मिळते. वरुण आणि सान्या मल्होत्रा दोघेही रिलेशनशिपमध्ये असतात. जान्हवी कपूर आणि रोहित सराफही कपल असतात. पण नंतर… सान्या आणि रोहितचे लग्न ठरते!

‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’सारख्या यशस्वी चित्रपटांनंतर शशांक खेतान पुन्हा वरुण धवनसोबत एक मजेशीर फॅमिली एंटरटेनर घेऊन आले आहेत. ट्रेलरमध्ये वरुणचा ‘बोल्ड आणि बिनधास्त’ अवतार पुन्हा पाहायला मिळतो, आणि जान्हवीही तिच्या ‘गर्ल-नेक्स्ट-डोअर’ लुकमध्ये मन जिंकते.

कधी येतोय चित्रपट?

करण जोहर निर्मित हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे. या चित्रपटात वरुण आणि जान्हवीसोबत सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल आणि अक्षय ओबेरॉय महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *