वरुण धवन, जान्हवी कपूर यांच्या सनी संस्कारी की तुलसी कुमारी या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातील ‘परफेक्ट’ गाणे प्रदर्शित
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर दोघेही त्यांच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटातील ‘परफेक्ट’ हे धमाल गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

‘परफेक्ट’ हे गाणे प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा यांने गायले असून, गाण्यात तो स्वतःही झळकतो. गुरु रंधावाच्या अनोख्या शैलीत आणि बीट्सवर तयार झालेले हे गाणे तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय होत आहे. ‘परफेक्ट’मध्ये जान्हवी कपूरचा हॉट आणि स्टायलिश लूक तर वरुण धवनचे जबरदस्त डान्स मूव्ह्स प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री एकदम ‘परफेक्ट’ आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात वरुण आणि जान्हवी व्यतिरीक्त रोहित सराफ, सान्या मल्होत्रा आणि मनीष पॉल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ चित्रपटगृहात धडकणार आहे.
