Saiyara on OTT: 12 सप्टेंबरपासून सैयारा ओटीटीवर; चाहत्यांची अनकट व्हर्जन प्रदर्शित करण्याची मागणी
चित्रपटगृहात धुमाकुळ घातल्यानंतर सैयारा आता ओटीटीवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सैयारा 18 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडत 300 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. तर जगभरात 570 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

(फोटो सौजन्य: नेटफ्लिक्स इंस्टाग्राम)
चित्रपट उद्या म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत ही माहीती दिली आहे. चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाच्या घोषणेसाबतच काही उत्साही चाहते निर्मात्यांना खास मागणी करत आहे. चाहते चित्रपटाचे अनकट वर्जन प्रदर्शित करण्याची मागणी करत आहे. चाहत्यांची ही मागमी पुर्ण होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोहीत सूरी दिग्दर्शित सैयारा चित्रपटाच्या निर्मितीची धुरा यशराज फिल्म्सने सांभाळली आहे. या चित्रपटाद्वारे चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडेने सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले. अनित पड्डाने चित्रपटात नायिकेची मुख्य भूमिका साकारली आहे.
