Ek Tha Tiger Re-Release: सलमानचा ‘एक था टायगर’ पुन्हा थिएटरमध्ये! मोठ्या पडद्यावर अॅक्शनचा धमाका अनुभवण्याची सुवर्णसंधी
बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा सुपरहिट अॅक्शनपट ‘एक था टायगर’ पुन्हा एकदा भव्य रिलीजसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला हा ब्लॉकबस्टर आता नव्या जोशात चित्रपटगृहात परतणार आहे.

या खास पुनर्प्रदर्शनामुळे सलमानच्या चाहत्यांना टायगरची धडाकेबाज स्टाईल पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच ज्यांना हा चित्रपट २०१२ मध्ये चित्रपटगृहात पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अद्याप या खास पुनर्प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यात आहे.

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सची सुरुवात ‘एक था टायगर’ने झाली आणि हिंदी सिनेमा एक नवा आयाम मिळाला. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांची केमिस्ट्री, अॅक्शन, थरार आणि मिशनने प्रेक्षकांची मने जिंकली होती. रणवीर शौरी, गिरीश कर्नाड, रोशन सेठ यांसारख्या कलाकारांनीही दमदार भूमिका बजावली होती.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसेच त्याचा ‘बजरंगी भाईजान २’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
