कार्तिक आर्यन आणि लव रंजन पुन्हा एकत्र
बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन आणि लेखक-दिग्दर्शक व निर्माता लव रंजन ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या जोडीचा हा पाचवा प्रोजेक्ट असणार आहे, जो सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे.
या दोघांमध्ये पुन्हा एकत्र काम करण्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होती आणि आता अखेर एक सशक्त स्क्रिप्ट तयार झाली आहे, जी दोघांनाही पुन्हा एकत्र आणत आहे. हा प्रोजेक्ट लव रंजनच्या ट्रेडमार्क शैलीतील हसवणारा, रोमँटिक आणि मनोरंजनाने भरलेला असेल. चित्रपटाबाबात सर्व तपशील अजून गुप्त ठेवण्यात आले आहेत, पण दोघेही खूप उत्सुक आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या खास अंदाजात आणि लव रंजनच्या स्टाईलमध्ये मनोरंजनाची मेजवानी अनुभवणार येणार आहे.
