Asia cup 2025: भारत-पाकिस्तान ‘हाय-व्होल्टेज’ सामना… पण स्टेडियम रिकामे? आयोजकांच्या धोरणावर प्रश्नचिन्ह!

दुबई: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडतो! पण यावेळी चित्र वेगळे आहे. दुबईत होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्याची तिकीट विक्री अद्याप ‘हाऊसफुल्ल’ झालेली नाही – हे आश्चर्यकारकच!
तिकीट पॅकेजने उत्साहावर विरजण!
या वर्षी आयोजकांनी तिकीट विक्रीच्या प्रणालीत मोठा बदल केला आहे.
▪️ थेट भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे खरेदी करता येणार नाहीत
▪️ संपूर्ण ग्रुप स्टेज पॅकेज घ्यावे लागणार – म्हणजे तब्बल ७ सामन्यांची एकत्र तिकिटे खरेदी करावी लागणार आहे.
किंमतींनी उडवली झोप!
सामान्य तिकिट: ४४० दिरहम (₹१०,५६५ पासून सुरुवात)
हॉस्पिटॅलिटी पॅकेज: ६०,५०० दिरहम (₹१४.५ लाखांपर्यंत)
ट्रॅव्हल पॅकेजेस:
₹५१,००० ते ₹१.५७ लाखांपर्यंत – हॉटेल + तिकीट + फ्लाइट्सचा समावेश. सर्वसामान्य चाहत्यासाठी हा खर्च परवडणारा नाही.

फ्लाइट्स आणि हॉटेल्सचे दर गगनाला भिडले
मुंबई-दुबई फ्लाइट: ₹११,००० पासून
दिल्ली-दुबई: ₹१५,००० पर्यंत
परतीचे तिकिट: ₹२५,००० ते ₹४०,०००

हॉटेल्सचा खर्च:
▪️ बजेट: ₹५,०००/रात्र
▪️ ३-४ स्टार: ₹९,००० ते ₹१२,०००
▪️ ५ स्टार: ₹१८,००० पेक्षा जास्त
पहलगाम हल्ल्यानंतर पहिली टक्कर
पहलगामटच्य दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे सामन्याचे महत्व फक्त खेळापुरते मर्यादित नाही. राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीही जोडलेली आहे.
चाहत्यांची मागणी – “फक्त भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीट द्या!”
“आम्हाला फक्त भारत-पाकिस्तान सामना पाहायचा आहे, इतर सामने नकोत!” सोशल मीडियावर चाहते आयोजकांवर ताशेरे ओढत आहेत. “कृपया एकाच सामन्यासाठी स्वतंत्र तिकीट उपलब्ध करा”, अशी मागणी जोर धरत आहे.
एकंदरीत चित्र काय?
भारत-पाकिस्तान सामना ‘हाय-व्होल्टेज’असला तरी यावेळी चाहत्यांचा उत्साह तिकीट योजनेमुळे कमी झालाय. आयोजक या तक्रारीकडे लक्ष देतात का, की स्टेडियमचे रिकामे आसन आपली गोष्ट सांगतील?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहेत.
