“न्यासा, सिनेमा तुझी वाट पाहतोय!” अजय देवगणच्या मुलीला लाँच करण्यासाठी हा दिग्दर्शक आहे उत्सुक
बॉलीवूडचे लोकप्रिय जोडपे अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या बॉलिवूड डेब्यूबाबत चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे. काजोल अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाली, “मला काही फोन आले आहेत, पण आत्ता तरी न्यासा चित्रपटसृष्टीत येणार नाही. जर तिला वाटले की तिला काही करायचे आहे, तर ती आम्हाला नक्की सांगेल. आम्ही तिच्यासोबत १००% आहोत.” या वक्तव्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, काही मोठ्या बॅनर्सनी न्यासाशी संपर्क साधला आहे.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अजय देवगणनेही आपल्या मुलीच्या फिल्म डेब्यूवर भाष्य केले होते. तो म्हणाला होता की, “सध्या तरी न्यासाला अभिनेत्री व्हायचे नाही. भविष्यात काय होईल सांगता येत नाही, पण आत्ता ती याचा विचार करत नाही.” फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी यावर्षी न्यासाचे एक सुंदर लेहेंग्यातील फोटो शेअर करत लिहिले होते की, “न्यासा, सिनेमा तुझी वाट पाहतोय!”

न्यासा स्वतः फारशी माहिती सोशल मीडियावर शेअर करत नाही, पण तिचे पापाराझी व्हिडीओ, इव्हेंटमधील हजेरी यामुळे ती नेहमी चर्चेत असते. न्यासाचा डेब्यू कधी आणि कोणासोबत होणार, यावर अजून अधिकृत माहिती नाही. पण करण जोहरसारखे दिग्दर्शक, मनीष मल्होत्रासारखे डिझायनर आणि चाहत्यांचा पाठिंबा बघता, न्यासा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकू शकते, अशी चर्चा आता जोर धरत आहे.
