पवन कल्याणच्या ‘दे कॉल हिम ओजी’मध्ये प्रकाश राजची एंट्री; निर्मात्यांकडून पहिला लूक प्रदर्शित
दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण लवकरच अॅक्शनने भरलेला दे कॉल हिम ओजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. आता या चित्रपटात दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांची एंट्री झाली आहे.
निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटातील प्रकाश राज यांच्या व्यक्तिरेखेचा लूक प्रदर्शित केला आहे. दे कॉल हीम ओजीमध्ये प्रकाश राज “सत्या दादा”च्या भूमिकेत झळकणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये प्रकाश राज गंभीर अंदाजात दिसतात. डार्क मरून कुर्ता, त्यावर शाल, डोळ्यावर चष्मा यातून त्यांच्या कडक भूमिकेची झलक दिसते.
सुजीत दिग्दर्शित या चित्रपटात पवन कल्याण आणि प्रकाश राज यांच्याशिवाय इमरान हाश्मी, प्रियांका अरुल मोहन, प्रकाश आणि श्रीया रेड्डी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता २५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
