‘कांतारा: चॅप्टर १’ आता स्पॅनिश आणि इंग्रजीतही; जागतिक स्तरावर भारतीय कथांची गूंज
२०२२मध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल ‘कांतारा: चॅप्टर १’ आता जगभरातील प्रेक्षकांसाठी स्पॅनिश आणि इंग्रजी डबसह प्रदर्शित होणार आहे.

ऋषभ शेट्टी अभिनीत आणि दिग्दर्शित हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, इंग्रजी व स्पॅनिशसह आठ भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.
जागतिक स्तरावर भारतीय कथांची गूंज
होम्बाळे फिल्म्सने ‘कांतारा’च्या यशानंतर आता भारतीय लोककथा आणि संस्कृती जगभर पोहचवण्यासाठी कमालीची तयारी केली आहे. मूळ चित्रपटाने भारतातच नव्हे, तर मेक्सिको, अर्जेंटिना, चिली, व्हेनेझुएला यांसारख्या देशांतील प्रेक्षकांनाही भावनांचे आणि संस्कृतीचे नाते दाखवले.
प्रचंड स्केलवर युद्ध दृश्यांची चित्रीकरण
‘कांतारा: चॅप्टर १’मध्ये ५०० सैनिक आणि ३,००० आंतरराष्ट्रीय क्रू मेंबरसह भव्य युद्ध दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘कांतारा’ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि जगभरातून मिळालेली दाद यामुळे निर्मात्यांनी प्रीक्वलसाठी अधिक महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन स्वीकारला आहे. जगभरातील प्रेक्षकांसाठी हा एक सिनेमॅटीक अनुभव ठरणार आहे.
