बॉलीवूडमनोरंजन

अक्षय-सैफच्या ‘हैवान’चे आउटडोअर शूटिंग पूर्ण; प्रियदर्शनचा अ‍ॅक्शन थ्रिलर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सैफ अली खान जवळपास 17 वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडदद्यावर एकत्र झळकणार आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या आगामी चित्रपटाच्या आउटडोअर चित्रीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कोची, वागमों आणि उटीसारख्या निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रीकरणाचा पहिला टप्पा संपला असून, टीम आता पुढील चित्रीकरणासाठी मुंबईकडे रवाना झाली आहे.

सैयामी खेरने एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहीती दिली. तिने लिहिले की, “अक्षय सर आणि सैफ सर यांच्यासोबत काम करणे म्हणजे शिकण्याचा आणि हास्याचे परफेक्ट मिश्रण होते. प्रियदर्शन सरांसोबतचा हा प्रवास अविस्मरणीय होता.”

17 वर्षांनंतर एकत्र

अक्षय आणि सैफ यांची जोडी 90च्या दशकात चांगलीच गाजली होती. ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘ये दिल्लगी’, ‘तू चोर मैं सिपाही’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. ‘टशन’ या 2008 साली आलेल्या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते.

केवीएन प्रॉडक्शन आणि थेस्पियन फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात येणारा ‘हैवान’ एक तुफानी अ‍ॅक्शन आणि ड्रामाचा अनुभव घेऊ येइल, अशी आशा आहे. अक्षय, सैफ आणि सैयामी व्यतिरीक्त हैवानमध्ये श्रिया पिळगावकरही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *