बॉलीवूडमनोरंजन

उतेकरांच्या ऐतिहासिक नाट्यात श्रद्धा कपूरची वर्णी; महाराष्ट्रीयन संस्कृती पडद्यावर उलगडणार

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच एका दमदार ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छावा फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी महाराष्ट्रीयन संस्कृतीवर आधारित ऐतिहासिक चित्रपटात श्रद्धा मुख्य भूमिका साकारणार असणार आहे.

“ITA” हे या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक असून, श्रद्धा या चित्रपटात महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या महिला व्यक्तिरेखेची भूमिका साकारणार आहे.श्रद्धा या भूमिकेसाठी खास तयारी करत आहे. ती लवकरच पारंपरिक नृत्याचे प्रशिक्षण घेणार असून, मराठी संस्कृतीचा गाभा उत्तमपणे उलगडण्यासाठी मेहनत घेत आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरु होणार असून, चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील विविध कलाकारांना एकत्र आणणार असून, सध्या इतर भूमिकांसाठी कास्टिंग सुरू आहे.श्रद्धा कपूर शेवटची ‘स्त्री २’ मध्ये झळकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *