बॉलीवूडमनोरंजन

सिद्धांतच्या एका पोस्टने चाहत्यांमध्ये निर्माण झाली नवी उत्सुकता

बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याच्या वर्कआउट पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच सिद्धांतने इंस्टाग्रामवर आपल्या कठीण वर्कआउट प्रशिक्षणाचे फोटो शेअर केले. पण सगळ्यांचे लक्ष वेधले कॉफी कपने ज्यावर देवगण फिल्म्सचा लोगो लागलेला होता.

यामुळे इंटरनेटवर चर्चा रंगली आहे की सिद्धांत देवगण फिल्म्सच्या आगामी क्रिएचर थ्रिलर चित्रपटासाठी तयारी करत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असलेला चित्रपट अजून अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही, पण सिद्धांतच्या पोस्टमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

गली बॉय, गेहराईयां, आणि अलीकडेच आलेला धडक २मधील सिद्धांतचा अभिनय लक्षवेधी होता. सिद्धांत लवकरच विकास बहल यांच्या ‘दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग’ या चित्रपटात जया बच्चन आणि वामिका गब्बी यांच्यासोबत झळकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *