ईशान, जान्हवी, विशालचा ‘होमबाउंड’ २६ सप्टेंबरला सिनेमागृहात; TIFF आणि कान्समध्ये मिळाली दाद
ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला, नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २६ सप्टेंबर २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माता करण जोहरने नुकतीच याची घोषणा सोशल मीडियावर केली.

(फोटो होमबाउंड पोस्टर सौजन्य: इंस्टाग्राम)
करण जोहरने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “कोणतीही भावना अंतिम नसते. #होमबाउंड येतोय २६ सप्टेंबरला!” चित्रपटाने याआधी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर करून ‘Un Certain Regard’ विभागात स्थान पटकावले होते. त्यानंतर Toronto International Film Festival (TIFF) मध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्टँडिंग ओवेशन मिळाले.

हा चित्रपट २०२० साली न्यू यॉर्क टाइम्समध्ये आलेल्या बशरत पीर यांच्या लेखावर आधारित आहे. यात दोन बालमित्रांची कथा आहे. जे पोलीस परीक्षेच्या तयारीदरम्यान जीवनातील तणाव, संघर्ष, आणि नात्यांच्या गुंत्यात अडकतात. र्मा प्रॉडक्शन अंतर्गत करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

