बॉलीवूडमनोरंजन

“बॉम्बे नाही, मुंबईच!” कपिल शर्माला मनसेचा इशारा

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये पुन्हापुन्हा “बॉम्बे” शब्द वापरल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट कपिल शर्माला इशारा दिला आहे. मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक्सवर (पुर्वीचे ट्विटर) पोस्ट करत लिहिले की, “शहराचे नाव ‘मुंबई’ आहे. ‘बॉम्बे’ किंवा ‘बंबई’ म्हणणे हे या शहराचा अपमान आहे आणि असे परत घडले, तर कठोर कारवाई केली जाईल.”

“कपिल शर्माने चूक दुरुस्त करावी!”

पुढे त्यांनी लिहिले, “कपिल शर्मा या शहरात काम करतो, इथले लोक त्याला प्रेम करतात, त्यानेच अशा शब्दांचा वापर करणे दुर्दैवी आहे. ‘मुंबई’ हे केवळ नाव नाही, तर आमचा अभिमान आहे.” जे मुंबई म्हणत नाहीत, त्यांना आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल!”

नेटफ्लिक्सवरही ‘बॉम्बे’?

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. या शोमध्ये होस्ट, सेलिब्रिटी किंवा अँकर वारंवार ‘बॉम्बे’ म्हणताना दिसतात, असा आरोप मनसेने केला आहे. खोपकर यांचे म्हणणे आहे की, “जेव्हा तुम्ही चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता म्हणता, तेव्हा मग ‘मुंबई’ का नाही? ३० वर्षांपूर्वी अधिकृतपणे नाव बदलूनही ‘बॉम्बे’ शब्द वापरणे हे अनादराचे लक्षण आहे.

”मनसेचा स्पष्ट इशारा”

कपिल शर्माने त्वरित चूक दुरुस्त करावी. शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आधीच सांगावे की, ‘मुंबई’ म्हणा, ‘बॉम्बे’ नाही. अन्यथा कारवाई होणार!” स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उपस्थित होत असल्याचे बोलले जात असले, तरी मनसेचा दावा आहे की, हा विषय फक्त ‘मुंबईच्या सन्मानाचा’ आहे, राजकारणाचा नाही.

अद्याप कपिल, त्याची टिम आणि नेटफ्लिक्सकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *