Disha Patani Entry In Aawarapan: इमरान हाश्मीच्या ‘आवारापन २’मध्ये दिशा पटानीची एन्ट्री! गँगस्टर जगातील प्रेमकथेचा नवा अध्याय लवकरच
बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा २००७मध्ये आलेला कल्ट रोमँटिक ड्रामा ‘आवारापन’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या चित्रपटात ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानीची वर्णी लागली आहे.

‘आवारापन २’ तीव्र प्रेमाची कथा गँगस्टरच्या पार्श्वभूमीवर
आवारापनमध्ये इमरान हाश्मीने ‘शिवम पंडित’ची भूमिका साकारली होती, जी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सिक्वेलमध्येही इमरान हाच रोल पुन्हा साकारणार आहे, तर दिशा पटानीची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.
“तोच आत्मा, पण नवे जग”
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आवारापन २’ ही एक तीव्र आणि भावनिक लव्ह स्टोरी असणार आहे. गँगस्टर जगतात घडणारी ही कथा पूर्वीइतकीच खोल आणि प्रभावी असेल. पण यावेळी पात्रे आणि कथानक अधिक विस्तारलेले असेल.

“पटकथेवर फिदा”
दिशाला कथेतल्या भावनिक प्रवाहाने भारून टाकले. ती स्क्रिप्टशी लगेच जोडली गेली आणि तिने कोणतीही शंका न घेता होकार दिला.
संगीत ठरणार पुन्हा एकदा हायलाईट
‘आवारापन’ चित्रपटाचे संगीत आजही प्रेक्षकांच्या हृदयात आहे. सिक्वेलमध्येही दमदार आणि हृदयस्पर्शी साउंडट्रॅक देण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. काही जुन्या गाण्यांचे रिक्रिएशन होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबरच्या अखेरीस सुरु होणार असून, जानेवारी २०२६पर्यंत पुर्ण होईल. ‘आवारापन २’ हा केवळ सिक्वेल नाही, तर जुन्या आठवणींना उजाळा देत एक नवी, अधिक भावनिक आणि भव्य प्रेमकथा सादर करण्याचा प्रयत्न आहे.
