सलमान-अरबाजला ‘मुन्नी बदनाम’ गाण्यात नको होती मलायका, दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट

(फोटो- सलमाव खान, मलायका अरोरा गुगल)
२०१० मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘दबंग’आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या चित्रपटातील आयकॉनिक गाणं ‘मुन्नी बदनाम हुई’ ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. पण या गाण्याच्या मागे एक मोठा वाद होता, असे आता खुद्द दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी उघड केले आहे.
सलमान आणि अरबाज ‘मुन्नी बदनाम’साठी मलायकाला नको म्हणाले होते!
अभिनव कश्यप यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान हे मलायका अरोराला या गाण्यात घेण्याच्या विरोधात होते. त्यांचे म्हणणे होते की मलायकाला ‘आयटम गर्ल’ म्हणवणे योग्य नाही. विशेषतः अरबाजला हे अजिबात पसंत नव्हते, कारण त्यावेळी मलायका त्याची पत्नी होती.

(फोटो – अभिनव कश्यप आयएमडीबी)
“ते त्यांच्या महिलांना लपवून ठेवतात”
अभिनव कश्यप यांनी स्पष्टपणे म्हटले, “सलमान आणि अरबाज हे दोघेही खूप रूढीवादी आहेत. ते त्यांच्या महिलांना झाकून ठेवायला प्राधान्य देतात. मलायकाच्या कपड्यांवरून सलमानशी वादही झाला होता.”

(फोटो – मलायका युट्यूब)
मलायकाने स्वतः ठाम भूमिका घेतली
या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरही मलायकाने स्वतः ठाम निर्णय घेतला. अभिनव म्हणाले की, “ती एक स्वतंत्र आणि विचार करणारी स्त्री आहे. तिला गाणे आवडले आणि तिने होकार दिला. मी अरबाजला समजावले की हे फक्त नृत्य आहे, काहीही वाईट नाही. शेवटी त्याने मान्य केले.”
गाण्याच्या यशानंतर सलमानचा बदललेला निर्णय
अभिनवने असा दावा केला की, सुरुवातीला सलमान खान या गाण्याचा भाग नव्हता. पण जेव्हा त्याला गाण्याची ‘हिट’ होण्याची क्षमता समजली, तेव्हा त्याने स्वतः पुढाकार घेतला. मग गाण्यात बदल करण्यात आला आणि सलमान, सोनू सूद व मलायका यांना एकत्र दाखवण्यात आले.
मलायका-अरबाज विभक्त
मलायका आणि अरबाजचे १८ वर्षांचे लग्न २०१७ मध्ये मोडले. अरबाजने नंतरप शूरा खानसोबत लग्न केले, तर मलायका पूर्वी अर्जुन कपूरसोबत नात्यात होती. मात्र आता दोघंही आपापल्या मार्गाने पुढे गेले आहेत.

(फोटो – अरबाज, मलायका सोशल मीडिया)
‘दबंग’चा सुपरहिट प्रवास
‘दबंग’ या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हाने डेब्यू केला होता. सोनू सूद, अरबाज खानही महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आणि ‘मुन्नी बदनाम’ गाणे आजही चाहत्यांच्या हृदयात घर करून आहे.
