बॉलीवूडमनोरंजन

शाहरुख खानचा ‘किंग’ लूक लीक

‘पठाण’ आणि ‘जवान’सारख्या ब्लॉकबस्टरनंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान ‘किंग’ हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे. पोलंडमधील चित्रीकरणादरम्यानच्या एका लीक व्हिडिओ क्लिपने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

या क्लिपमध्ये पांढरे केस झालेला शाहरुख अंगावर टॅटूजच्या अवतारात दिसतोय. हा नवा अंदाज पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्टचा वर्षाव केला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत मोठ्या काळ्या हुडीने आपला लूक लपवताना दिसतोय.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता अर्शद वारसीही आहे. अर्शदने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत म्हटले, ‘माझ्या आवडत्या कलाकारासोबत चित्रीकरण सुरू आहे… देवाचे आभार!

या चित्रपटात सुहाना खान, अभिषेक बच्चन यांच्यासह दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, जॅकी श्रॉफ आणि अभय वर्मा अशा तगड्या कलाकार मंडळीचे खास कॅमिओ असणार आहेत. ‘किंग’ सध्या निर्मितीच्या टप्प्यात असून, तो आॅक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *