बॉलीवूडमनोरंजन

‘बॉर्डर २’मध्ये सोनम बाजवाची एन्ट्री! दिलजीतसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

बॉलीवूड अभिनेता सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, मोना सिंग, मेधा राणा आणि अहान शेट्टी स्टारर ‘बॉर्डर २’ हा बहुप्रतिक्षित युद्धपट सध्या चर्चेत आहे. या दमदार स्टारकास्टमध्ये आता सोनम बाजवाचे नाव जोडले गेले असून, त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

(फोटो सौजन्य सोशल मीडिया)

सोनम बाजवा आणि दिलजीतची पुन्हा एकत्र

सोनम बाजवा आणि दिलजीत दोसांझ या जोडीने याआधी ‘पंजाब १९८४’, ‘सरदारजी २’, ‘सुपर सिंग’ आणि ‘हौसला रख’सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘बॉर्डर २’मध्ये दोघे पुन्हा एकत्र झळकणार असल्यामुळे चाहते प्रचंड उत्साही आहेत.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित कथा

‘बॉर्डर २’ हा १९९७ च्या क्लासिक ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्याचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले होते. या चित्रपटात भारत-पाकिस्तानमधील युद्ध पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सनी देओल म्हणाला…

सनी देओलने एका मुलाखतीत सांगितले की, “कधीच काही निश्चित नसते. सुरुवात करताना खूप चर्चा होतात, पण शेवटी आपल्याला प्रवाहाबरोबर जावे लागते.” आव्हानात्मक काम करणे हेच खऱ्या कलाकाराचे वैशिष्ट्य आहे.

अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ हा केवळ एका युद्धाची कथा नाही, तर भारताच्या शौर्याचा भव्य सिनेमा ठरणार आहे. सोनम बाजवाची एन्ट्री, दिलजीतसोबतची जोडी, आणि सनी देओलचा परत एकदा युध्दभूमीवर तगडा अवतार, प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण पॅकेज ठरणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धूरा सांभाळली आहे.

One thought on “‘बॉर्डर २’मध्ये सोनम बाजवाची एन्ट्री! दिलजीतसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *