बॉलीवूडमनोरंजन

‘निशांची’मध्ये वेदिका पिंटोचा धमाकेदार डान्स नंबर!

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट ‘निशांची’ सध्या जोरदार चर्चेत आहे. दमदार स्टारकास्ट, हटके कथा आणि आता आणखी एक आकर्षण म्हणजे वेदिका पिंटोचा खास डान्स नंबर.

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

वेदिकाचा डान्स नंबर ठरणार हायलाईट!

चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी वेदिका पिंटो एका ऊर्जेने भरलेल्या खास गाण्यात नृत्य करताना दिसणार आहे. हे गाणं केवळ आयटम सॉंग नाही, तर चित्रपटाच्या कथेला एक वेगळी रंगत देणारे सादरीकरण आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिकाने या गाण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. तिच्या एनर्जीने भरलेल्या स्टेप्स आणि अदा प्रेक्षकांना नक्कीच थक्क करतील!” फिटनेस आणि सरावाला दिली प्राधान्यवेदिकाने गाण्यासाठी विशेष फिटनेस ट्रेनिंग घेतले आहे. अनेक तास सराव करून प्रत्येक स्टेप परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या नृत्यामुळे गाण्याला एक ग्लॅमरस टच मिळेल अशी आशा आहे.

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

‘निशांची’ चित्रपटाविषयी

या चित्रपटातून बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे निशांचीमध्ये त्याची दुहेरी भूमिका असणार आहे. त्याच्यासोबतसोबत विनीत कुमार सिंह, मोनिका पवार, मोहम्मद झीशान अय्युब, कुमुद मिश्रा यांच्याही दमदार भूमिका आहेत. १९ सप्टेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात धडकणार आहे.

अनुराग कश्यपचा प्रत्येक चित्रपट वेगळा असतो, आणि ‘निशांची’ त्याच परंपरेतील आणखी एक धक्का देणारा प्रयोग ठरणार, असे चित्र आता स्पष्ट होत आहे. गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल हा चित्रपट असेल, असाही सूर सोशल मीडियावर उमटतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *