मनोरंजनसाउथ सिनेमा

झोपडपट्टीचा बाहुबली! नानीच्या ‘द पॅराडाईज’साठी हैदराबादमध्ये उभा राहतोय ३० एकरचा भव्य सेट

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

नॅचरल स्टार नानीच्या आगामी चित्रपटासाठी हैदराबादमध्ये ३० एकरवर एक प्रचंड मोठा सेट उभारला जात आहे. सध्या सिनेसृष्टीत याची चर्चा जोमात सुरु आहे. ‘द पॅराडाईज’ या चित्रपटाचा हा झोपडपट्टीवर आधारीत असलेला सेट ‘बाहुबली’च्या सेटइतकाच भव्य असणार आहे.

झोपडपट्टीचा बाहुबली तयार होतोय!

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, “या सेटमध्ये एक भव्य कमान असेल आणि झोपडपट्टीचे वास्तवदर्शी वातावरण उभे करण्यात येईल. ‘बाहुबली’मध्ये जसे माहिष्मती साम्राज्य भव्य पद्धतीने दाखवले गेले, तसेच इथे झोपडपट्टीचे साम्राज्य उभे केले जात आहे.

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

“एवढा मोठा सेट का ?

निर्मात्यांचे म्हणणे आहे की, “जितका सेट खरा वाटेल, तितकेच प्रेक्षक त्यात गुंततील. त्यामुळे झोपडपट्टीतील गल्ल्या, घरे, रस्ते सर्व काही बारकाईने तयार केले जात आहे.” या भव्यतेमुळेच या चित्रपटाला आतापासूनच ‘झोपडपट्टीचा बाहुबली’ असे टोपणनाव मिळाले आहे.‘द पॅराडाईज’ मध्ये नानी एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो झोपडपट्टीतून बाहेर येतो आणि यशाचे शिखर गाठतो. या प्रवासातले टप्पे, संघर्ष, बदल आणि उभारणी सगळं या भव्य सेटवरच चित्रित होणार आहे.

(फोटो सौजन्य इंस्टाग्राम)

८ भाषांमध्ये होणार प्रदर्शित

श्रीकांत ओडेला दिग्दर्शित ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा ८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य-सिनेमॅटीक अनुभव घेऊन येईल, अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *