राजकुमारचा ‘मालिक’ ओटीटीवर धडकला

बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘मालिक’ हा त्याचा चित्रपट ५ सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाची कथा दीपक या तरुणाच्या भोवती फिरते. एक साधा सरळ मुलगा, जो गुन्हेगारीच्या जगात पाऊल टाकतो आणि हळूहळू अलाहाबाद (आताचे प्रयागराज) चा ‘मालिक’ बनतो.

पुलकित दिग्दर्शित मालिकमध्ये राजकुमार रावसोबत प्रोसेनजीत चॅटर्जी, मानुषी छिल्लर, हुमा कुरेशी, अंशुमन पुष्कर, मेधा शंकर, सौरभ सचदेवा, सौरभ शुक्ला आणि स्वानंद किरकिरे यांच्या भूमिका आहेत.
