माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी ‘मा बेहन’मध्ये एकत्र

माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी या दोन दमदार अभिनेत्री एका अनोख्या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. ‘मा बहेन’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.
सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित हा चित्रपट विनोदीनाट्य प्रकारातील असून, त्यात आई-मुलीच्या नात्यातील गोडवा, संघर्ष आणि हास्य यांचे सुरेख मिश्रण असणार आहे.
या चित्रपटाद्वारे माधुरी आणि तृप्ती दुसऱ्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी त्या दोघी ‘भूल भुलैया ३’मध्ये एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटात शार्दुल भारद्वाज, धरना दुर्गा आणि रवि किशन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मा बहेनचे कथा आणि संवाद लिहिण्याची धूरा सुरेश त्रिवेणी आणि पूजा तोलानी यांनी सांभाळली आहे.
