भारताची पहिली महिला सुपरहिरो!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत मल्याळम सुपरहिरो चित्रपट ‘लोका…’चे जबरदस्त कौतुक केले आहे. तिने हा चित्रपट तिच्या वॉचलिस्टमध्येही जोडला असून चाहत्यांनाही तो पाहण्याचे आवाहन केले आहे.
तिने लिहिले की, “भारताची पहिली महिला सुपरहिरो आली आहे! ‘लोका’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. ही कथा मल्याळममध्ये लोकांची मने जिंकत असून, आता हिंदीमध्येही आली आहे. मी तर पाहण्यासाठी सज्ज आहे… तुम्ही पण?”
‘लोका’ ही चंद्रा नावाच्या एका मुलीची कथा आहे जिने सुपरपॉवर्स मिळवलेल्या आहेत. ती बंगळुरूमध्ये राहते आणि गरजू पुरुष-महिलांच्या समस्या सोडवते. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या सोबतच समिक्षकांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शनने मुख्य भूमिका साकारली असून, तिचा अभिनय, अॅक्शन आणि स्क्रीन प्रेझेन्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
